Skip to main content

Posts

Featured

        *तत्त्वनिष्ठ* "अहो ऐकलंत का? राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?" "का राहूलने नेला नाही डबा?" शरदरावांनी विचारलं. " आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत."त्यामुळे सकाळी लवकर  डबा तयार नाही झाला. "ठीक आहे. देतो मी नेऊन." शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले. पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला. शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला, राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच 'वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.' काय केल माझ्यासाठी बापाने हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता, "आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय् बघ. नाहीतर नाना! अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवत आहेत." राहूल तावातावाने बोलत होता. "राहूल तुला माहीत आहे की नाना घरात मोठे. त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच क...

Latest Posts

प्रदुषण- एक समस्या